न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२४) :- टाटा गाडीवरील चालकाने हयगईने, अविचाराने, भरधाव वेगात वाहन चालवत अॅक्टीव्हा गाडी (एम.एच.१४ एफ.क्यु. ८५४४) वरील चालक सुनिल महादेव यादव (वय-४१ वर्षे, रा. पवनानगर, गल्ली नं.४ काळेवाडी) यांच्या गाडीस पाठीमागुन धडक दिली. त्यांच्या मृत्युस चालक कारणीभुत झाला.
दोन्ही गाडयांचे नुकसान करण्यास आरोपी कारणीभुत झाला. जखमीस कोणत्याही प्रकारे प्रथमोपचार न देता वाहन सोडुन अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे. हा प्रकार (दि. २०) रोजी सकाळी ०७/०० वा.चे सुमा. मोरवाडी पिंपरी पुणे कडुन के.एस.बी चौकाकडे जाणारे रोडवर नटराज ग्लास कंपनीचे समोर पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी मिंटु कुमार सिंग (वय-२२ वर्षे, रा. तापकीर मळा, टाटा इंटरनॅशनल स्कुल शेजारी काळेवाडी) याच्या विरोधात पिंपरी पोलिसांनी ८४४/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चेकलम २८१, १०६,३२४(४) (५) मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गुळींग तपास करीत आहेत.










