न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२४) :- पत्नीला वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या पती आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सावत्र सासऱ्यानेही पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. कासारवाडी येथे ८ मार्च २०२२ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित ३२ वर्षीय महिलेने या प्रकरणी शुक्रवारी (दि. २०) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पीडित महिलेचा पती व सावत्र सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा पती आणि सावत्र सासरे यांनी फिर्यादी पीडित महिला यांना एक अॅप त्यांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर पीडित महिलेच्या मोबाइलवर एका ग्राहकाने संपर्क केला असता पीडित महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पाठविले. त्यातून मिळणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च केला. पीडित महिलेने त्यांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली. तसेच सावत्र सासरा यानेही पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.










