- भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा पिंपरीवर दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२४) :- विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा आमदार असणाऱ्या पिंपरी विधानसभेवर महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजपने दावा केला आहे. भाजपच्या आमदार आणि पदाधिकारी यांनी बैठक घेऊन पिंपरीवर दावा केला आहे.
मोरवाडी येथील भाजपच्या शहर कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे आदी प्रमुख उपस्थित होते.
पिंपरी मतदारसंघात भाजपचे अमर साबळे यांचा निसटता पराभव झाला. नंतर हा आरपीआयला सुटला. भाजपची ताकद आता दुप्पट झाली आहे. येथे भाजपचे आता १४ नगरसेवक आहेत.
लोकसभेला खासदारांना १७ हजारांची आघाडी दिली. भाजपच्याच कार्यकर्त्याला इथे संधी द्यावी. आमदार पिंपरी मतदारसंघात भाजपची ताकद आहे. संघटन आहे, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली.










