- वाहनांचे लोकार्पण अनं ‘स्थायी आदेश’ पुस्तकाचे प्रकाशन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२४) :- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढवा घेतला. त्यानंतर पोलिसांचे अभिनंदन करून लोकांना अभिमान वाटेल, असे काम करत राहा, असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला.
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला उपलब्ध झालेल्या ५७ चारचाकी वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बुधवारी झाले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या ‘स्थायी आदेश’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले.
आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, शिवाजी पवार, स्वप्ना गोरे, माधुरी कांगणे, बापू, बांगर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांना आयुक्त चौबे यांनी सादरीकरणाद्वारे पोलिसांच्या कामाची माहिती दिली. शहरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त चौबे यांनी दिली. त्यावर महिलांच्या सुरक्षिततेकडे जास्त लक्ष द्या, अशी सूचना पवार यांनी केली.
मंजुरी मिळालेली महत्त्वाची कामे…
पोलिस आयुक्तालय कार्यालयासाठी चिखली येथे २५ एकर जागा.
पोलिसांच्या निवासस्थानासाठी वाकड येथे नऊ एकर जागा बावधन.
संत तुकारामनगर, काळेवाडी, दापोडी या चार पोलिस ठाण्यांना मंजुरी.
पोलिस आयुक्तालय नवीन इमारतीच्या आराखड्यास मंजुरी.
पिंपरी पोलिस ठाणे आणि २०० निवासस्थानांसाठी निधी मंजूर.
आळंदी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचा आराखडा मंजूर.
महाळुंगे पोलिस ठाण्यासाठी सीएसआर फंडातून १६ कोटी निधी मंजूर.
पोलिस आयुक्तालयाच्या ५७ वाहनांचे लोकार्पण झाले. उपमुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेत पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. काही सूचनाही केल्या.
– विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त…












