- मावळची जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून आम्ही आग्रही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १८ ऑक्टोबर २०२४) :- महायुतीचे नेते मावळच्या उमेदवारामागे ठाम राहतील. लोकसभा निवडणुकीत एकसंघ काम केलं. त्यातून उमेदवाराला विजयी मताधिक्य मिळालेलं आहे. पुढे मावळ विधानसभा मतदारसंघात कुठला उमेदवार द्यायचा हे निश्चित झालं नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून आम्ही आग्रही आहे. माझ्यासह इतर काही जण इच्छुक आहेत. यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील, असं मत विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल.
जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही. तोपर्यंत उमेदवारी मिळावी म्हणून मी कुणाच्या घरी जाणार नाही. मलाच उमेदवारी द्या म्हणून आग्रही नाही. शिफारस करणार नाही, अस शेळके यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, इच्छुक राहणं हे गैर नाही. हा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे स्वागत करायला हवं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कशी फूट पडेल?,अजित पवारांच्यासोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील. यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडू. आमच्या पक्षातील एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्यास कुणी-कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाव व्यासपीठावर जाहीर करणार. असा थेट इशारा शेळके यांनी दिला आहे. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास एकसंघ राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.











