न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२४) :- मशिनवर काम करताना मशिनमध्ये अडकुन कामगाराचा मृत्यु झाला आहे. मोहनलाल जोखनप्रसाद गौतम (उत्तरप्रदेश) असं मृत्यू झालेल्या कामगाराच नाव आहे.
स्टिल यार्ड कंपनी, आपना वजन काट्यासमोर, कुदळवाडी, चिखली इथे (दि. १७) रोजी ११. ०० वा. चे सुमारास ही घटना घडली आहे. मशिनचे प्रशिक्षण न देता आणि कामगारांवर देखरेखीसाठी कुणीही नसताना कंपनी मालकाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी १) फैयाज उमर शेख, वय ५२ वर्षे, २) फारुख उमर शेख, वय ५८ वर्षे, दोन्ही रा. परमार पार्क, जांभुळकर चौक, वानवडी, पुणे या दोघांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात ६१९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एल. एम. मोगले, पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.