- स्थानिक शिवसैनिकांची भावना; प्रवेशाला केला विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२४) :- राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेना प्रवेश शहर शिवसेनेला रुचल्याचे दिसत नाही. ‘आम्हाला विचारात न घेता कुणाचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाल्यास त्या आयात उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही’, असा ठराव उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आकुर्डी येथील सेना भवनात शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, संजोग वाघेरे, सुलभा उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींनी स्थानिक शिवसैनिकांना अंधारात ठेवले. त्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भोंडवे यांच्या प्रवेशाला शिवसैनिकांनी विरोध केला आहे. आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्या उमेदवाराचं काम करायचं नाही, असा ठाकरे गटाच्या वतीने ठराव करण्यात आला आहे.











