- पंकज पाटील आणि प्रदीप ठेंगल यांची उपायुक्त पदी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२४) :- महापालिका सेवेत राज्य सरकारच्या सेवेतील दोन उपायुक्त प्रतिनियुक्तीवर रुजू झाले आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले पंकज पाटील यांना उप आयुक्त पदावर नव्याने पदस्थापना देण्यात आली आहे. तर नवी मुंबईतील नगरपरिषद प्रशासन संचालनालयात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले प्रदीप ठेंगल यांना नव्याने महापालिका सेवेत उपआयुक्त पदावर रुजू करुन घेण्यात आले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील गट अ व ब मधील प्रशासकीय अधिकाऱ्याच्य बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत नगरविकास विभागाच्या वतीने बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत कार्यरत असलेले पंकज पाटील यांना महापालिका सेवेत उपआयुक्त पदावर आणखी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तर प्रदीप ठेंगल यांना नव्याने उपआयुक्त पदावर रुजू करुन घेण्यात आले आहे.

















