न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मंत्रालयाशी संबंधित मंत्रालयातील प्रशासकीय कामकाज पाहण्याकरिता दोन अधिकाऱ्यांची समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय कामकाजाकरिता प्रशासन अधिकारी राजेश आगळे आणि लिपिक आकाश चव्हाण तर अभियांत्रिकी कामकाजासाठी उपअभियंता दीपक भोजने आणि दीपक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधिमंडळ कामकाजाच्या अनुषंगाने महापालिकेशी संबंधित प्राप्त होणारे तारांकीत प्रश्न, चर्चा याबाबतची उत्तरे राज्य सरकारला विधीमंडळात द्यावी लागतात. त्यामुळे या चारही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी काढले आहेत.











