न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२५) :- नव्याने निर्माण होणारी अनधिकृत बांधकामे व औद्योगिक पत्राशेडवर चिखली परिसरात शुक्रवारी (दि. ४) महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.चिखलीच्या सोनवणे वस्ती रस्त्यालगत बांधकाम सुरू असलेल्या एकूण तेरा शेडवर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
औद्योगिक पत्राशेड बांधकाम करताना महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे बंधनकारक असूनही चिखली व तळवडे परिसरात अनेक ठिकाणी नव्याने शेड बांधकामे होत आहेत. नव्याने अनधिकृतरीत्या निर्माण होणाऱ्या पत्राशेडवरील कारवाई कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचेही महापालिकेने सांगितले.
या बांधकामांना सूचना देऊनहीं मिळकतधारक गांभीर्याने घेत नसल्याने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.










