- पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा चर्चा सत्रात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०९ एप्रिल २०२५) :- पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा ठरविण्यासाठी बुधवारी झालेल्या चर्चासत्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी, माजी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी सहभागी होत विविध विषयांवर आज सविस्तर चर्चा केली. पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत असून या अनुषंगाने दळणवळण आराखडा तयार करण्यात यावा, दळणवळण आराखडा तयार करताना पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार केला जावा, असे मतही लोकप्रतिनिधींनी मांडले.
महामेट्रोच्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वतीने आयोजित चर्चा सत्र ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेंद्र गावडे, राजू दुर्गे, मारूती भापकर, सचिन चिखले, अभिषेक बारणे, शर्मिला बाबर,सुवर्णा बुर्डे, सुनिल कदम, संतोष मोरे,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अमोल मुदळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तेजस चव्हाण, ऋषभ खरात आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात भविष्यातील होणारे मेट्रो मार्ग , बीआरटी, बस थांबे, वाहनतळ, पूल तसेच शहरात सुरु असलेल्या दळणवळण संबंधित प्रकल्पांबाबत चर्चासत्रामध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी शहरातील दळणवळण व्यवस्था सक्षम व्हावी, शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप
पुणे मेट्रोचे नाव बदण्याची मागणी शहरातील नागरिक पूर्वीपासून करत असल्याची आठवण करून दिली व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना पुणे मेट्रोचे नाव बदलण्याची मागणी केली.संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची पुणे मेट्रोचे नाव बदलून पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो करावी अशीच मागणी आहे. तसेच मेट्रो खांबावर वारकरी थीमवर आधारित चित्र रेखाटणी करण्यात यावी, पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वेचे जंक्शन करण्यात यावे.
शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा…