- सुमारे एक लाख पुस्तकांची छपाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी तब्बल २७ लाखांचा खर्च होणार आहे….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२५) :- पालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असणाऱे विद्यार्थी यांच्यासाठी सक्षम मराठी आणि गणित या विषयाची तीन भागात अंदाजे १ लाख पुस्तके खरेदी केली जाणार आहे. तशी निविदा शिक्षण विभागाच्या मागणीनुसार मध्यवर्ती भांडार विभागाकडून काढण्यात आली आहे. मराठी व गणित या पुस्तकांची छपाई करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. गणित या विषयाची उर्दू व मराठी भाषेतील पुस्तके छापण्यासाठी ४९ लाख ४० हजार रुपयांची निविदा काढली होती. त्यामध्ये सर्वात कमी १४ लाख ८७ हजार ३३१ इतका कमी दर गणेश ऑफसेटने सादर केला. त्यानुसार, त्यांच्याकडून ही पुस्तके छापून घेण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे.
दुसरी निविदा ही मराठी पुस्तक भाग एक ते दोन या पुस्तकांची छपाई करण्यासाठी ३६ लाख ६८ हजारांची निविदा काढण्यात आली. त्यामध्य गणेश ऑफसेटने सर्वात कमी ११ लाख ९३ हजार २३५ रुपये दर सादर केला, हा दर वाजवी व कमी असल्याने त्यांच्यासोबत करारनामा करून पुस्तके छापण्याच्या खर्चास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.













