न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- अमित हा सोपान आणि एम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नेहरुनगर शाखेत काम करीत होता. यावेळी अमित याला कंपनीच्या व्यवस्थापकाने रात्रपाळी दिली होती. मात्र, सतत रात्रपाळीमुळे अमित हा त्रस्त झाला होता. त्याने व्यवस्थापकाकडे रात्रपाळी बदलून मागितली. मात्र, व्यवस्थापकाने ती मागणी अमान्य केली.
यामुळे वैतागून अमित याने पिंपरी रेल्वेस्टेशन येथे रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित विलास धावरे (वय २५, रा. भोसरी), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवार (दि. २३) रोजी घडली. याप्रकरणी विलास चांगदेव धावारे यांनी फिर्याद दिली आहे.











