न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचा पुणे लोकसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज पुण्यात त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेडी, पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस अमोल थोरात, शहर महिला अध्यक्षा शैला मोळक, नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.











