न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलिस उपायुक्त रामनाथ पोकळे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांच्या जागी ही नियुक्ती झाली आहे. तर रानडे यांची अमरावती येथे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.
राज्य गृह विभागाने आज शुक्रवार (दि. २४ मे) रोजी राज्यातील २० वरिष्ठ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही पोलिस उप महानिरीक्षक अधिका-यांना विशेष पोलिस महानिरीक्षक व अधीक्षक दर्जाच्या अधिका-यांना पोलिस उप महानिरीक्षक / अप्पर पोलिस आयुक्त पदी बढती देण्यात आली आहे.











