- रवी पुजारी टोळीशी कनेक्शन उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी मार्केट परिसरात भरदिवसा दुकानात घुसून व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न करताना गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली.
तब्बल ७०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी रविंद्र भाऊसाहेब घारे (वय ४०, रा. चिखली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ग्रॅम सोन्याची चैन, देशी बनावटीचे पिस्टल, ११ जिवंत काडतुसे व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
तपासात आरोपीवर खून, खंडणी, जबरी चोरी, वाहनचोरी आणि गोळीबार असे २५ गंभीर गुन्हे असल्याचे उघड झाले. तो कुख्यात रवी पुजारी व सुरेश पुजारी टोळीशी संबंधित असून यापूर्वी दोनदा मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. या कारवाईत चिंचवड, भोसरी एमआयडीसी आणि वडगाव मावळ येथील तीन वाहनचोरीचे गुन्हेही उघडकीस आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने केली.
– डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), पिंपरी चिंचवड…












