चाकणमध्ये पोलिस शिपायावर जीवघेणा हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २५ ऑगस्ट २०२५) :- महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस शिपायावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता खराबवाडी गाव हद्दीत, नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळील रस्त्यावर पोलिस शिपाई शिवाजी वसंत मरकड (ब.नं. ३३५९) हे आपत्कालीन मदतीचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी दीपक अशोक जंगले (वय १९, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) याने हातात सत्तुर घेऊन फिर्यादीस धमकावले. “तुम्ही मला पकडायला आला आहात काय, आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही” असे म्हणत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने शिताफीने हल्ला चुकवून आरोपीला पकडले. मात्र, झटापटीत आरोपीने फिर्यादीच्या हातास चावा घेऊन दुखापत केली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम सह आर्म्स अॅक्ट कलम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि घुले हे करीत आहेत.













