- ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, (२५ ऑगस्ट २०२५) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘द फोक परंपरा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बार्टी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि कलारंग सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, आमदार आश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, भाऊसाहेब भोईर, बाळासाहेब रसाळ, अनिल सौंदळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात तुकाराम पाटील, राज अहिरराव, तानाजी एकोंडे, धनंजय भिसे आणि शामला पंडित यांना ‘अण्णाभाऊ साठे सन्मान’ देऊन प्रत्येकी ५ हजार रुपये व स्मृतीचिन्ह देण्यात आले. महानगरपालिकेच्या विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिचा जर्मनीतील United World College मध्ये निवड झाल्याबद्दल ११ हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार झाला.
सांस्कृतिक सादरीकरणांनी प्रेक्षागृह उत्साहाने भरून गेले. प्रमुख पाहुण्यांनी अण्णाभाऊंच्या साहित्य व विचारांचा गौरव करत सामाजिक समतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाला सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, अनुराधा गोरखे, शीतल शिंदे, सुजाता पालांडे, जयश्री गावडे, राजेंद्र बाबर, संदीप वाघेरे, अमित गावडे, संदीपान झोंबाडे, अतुल इनामदार, संजय कणसे, गणेश वाळुंजकर, बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन धनंजय खुडे यांनी केले.













