न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत महानगरपालिकेने आपल्या शहरातील नागरिकांना मतदार यादी मधील आपले नाव व मतदान केंद्र शोधणे बाबत मनपा संकेतस्थळावर ऑनलाईन सर्च सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मतदारांना मतदार यादी मधील भाग क्रमांक व अनुक्रमांक या बरोबरच मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता या सर्च सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
मनपाचे संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in यावर उपलब्ध असलेल्या मतदार नाव शोधणे (search voter name) या लिंक वर, सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ही सेवा सुरू झाल्यापासून आज अखेर ३९,३५६ नागरिकांनी लाभ घेतला आहे, यापैकी ५,४३८ नागरिकांनी सारथी हेल्पलाइन वरती कॉल करून आपल्या मतदान केंद्राची माहिती घेतली तसेच ३३,९१८ नागरिकांनी मनपा संकेतस्थळावरील वोटर सर्च चा वापर केला आहे, सारथी हेल्पलाइन वर आलेल्या कॉल नुसार काही नागरिकांनी विविध राजकीय पक्षांकडून मतदार स्लिप मिळाल्या असल्या तरी त्यावरील नमूद केंद्र योग्य आहे अथवा नाही हे तपासण्यासाठी हेल्पलाइनला फोन केलेला आहे.
सदरची सेवा शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्या कामी उपयोगी ठरावी या उद्देशाने कार्यरत आहे, तरी नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राची माहिती घेण्यासाठी ऑनलाइन वोटर सर्च अथवा सारखी हेल्पलाइन (८८८८००६६६६) वर कॉल करून या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.












