- आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधीवर सरकारचा प्रतिसाद; पुणे–पिंपरी-चिंचवड विकास प्रकल्पांना गती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.१२ मार्च २०२६) :- पुणे मेट्रोपोलिटन रिजनमधील रस्तेविकास व इतर पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाला गती देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधी महापालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
आमदार महेश लांडगे यांनी पुणे–नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी, नाशिक फाटा ते इंद्रायणी नदीपर्यंत ६१ मीटर रुंदीकरणासाठी भूसंपादन आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाबाबत शासनाचे लक्ष वेधले. तसेच पीएमआर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंगल पॉईंट अथॉरिटीची गरजही त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूसंपादनासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही. महापालिका, पीएमआरडीए व राज्य सरकारच्या स्तरावर लवकरच आढावा बैठक घेऊन प्रकल्पांना गती देण्यात येईल.












