- मराठवाडा जनविकास संघ व शारदा प्रतिष्ठानतर्फे शाळांचा सन्मान, ग्रंथवाटप..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.१२ मार्च २०२६) :- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघ, पुणे आणि शारदा प्रतिष्ठान भालकी (जि. बिदर) यांच्या संयुक्त विद्यमाने भालकी तालुक्यातील अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सीमावर्ती भागात मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा” या ब्रीदवाक्याखाली मराठी भाषेचे महत्त्व व संवर्धन यावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळांना भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज गाथा तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अरुण श्रीपती पवार आणि शारदा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दिनकर मोरे यांनी केले. यावेळी ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, प्रा. रविंद्र खांडेकर, सुधाकर थिटे, किशोर अट्टर्गेकर, तुकाराम नारायणराव मोरे, हरिदेव रुद्रमणी, तुकाराम शेडोळे, अमृत अक्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.












