- खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१२ मार्च २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी योगेश बहल म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी समतोल विकासाची भूमिका घेत औद्योगिक व ग्रामीण विकासाला चालना दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा भक्कम पाया रचला गेला.
कार्यक्रमास कविता आल्हाट, फजल शेख, विनायक रणसुभे, उज्वला ढोरे, वर्षा जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












