- आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकाराच्या कार्याचा गौरव….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.१२ मार्च २०२६) :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी घालून दिलेली प्रशासकीय शिस्त आजही मार्गदर्शक ठरते.
कार्यक्रमास उपायुक्त राजेश माशेरे, हिम्मत खराडे, श्वेता पाटील, स्मिता कलकुट्टी, तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुष्पांजली अर्पण केली.












