- पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे कडक कारवाईचे आदेश..
- नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१२ मार्च २०२६) :- घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबत सर्व पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अशा प्रकारचे अवैध कृत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.
तसेच नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस भरण्याचा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला ०२०-२७३५२६००, २७३५२५०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.











