न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२ मध्ये स्वछता अभियान व डेंग्यू जनजागृती तसेच औषध फवारणी व ‘आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याअंतर्गत तुकाराम नढे कॉलनी, फिनॉलेक्स कॉलनी, तापकीर मळा, राजवाडेनगर, पंचनाथ कॉलनी, सहकार कॉलनी परिसर, अश्विनी कॉलनी या भागात जिजामाता वैद्यकीय विभाग, यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल यांच्यामार्फत डेंगूच्या आळ्या ची व मलेरिया डासांची तपासणी करून औषध फवारणी करण्यात आली.
विनोदभाऊ तापकीर स्वीकृत नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. यावेळी MPW हिरेमट, MPW खरात, MPW संतोष काशीद, कीटक नाशक विभागाच्या मलेरिया निरीक्षक आश्विनी सुकटे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे पाटील, कर्मचारी संदीप शिंदे, रमेश जगताप, विनोद धेंडे, सुनील वलगडे, परशुराम शिंदे आदी उपस्थित होते.















