न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या वतीने आज सोमवार (दि. १०) रोजी संत तुकारामनगर मधील आचार्य अत्रे सभागृहात केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच नवनिर्वाचित खासदार गिरीष बापट यांचा जाहीर सत्कार तसेच भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयाचे ई-उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी शहर भाजपकडून पैसे देऊन गर्दी जमविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. प्रत्येक महिलेला ५०० रुपये दिल्याचं स्पष्ट झाले आहे. पैसे देताना रंगेहाथ पकडल्यानंतर पैसे वाटणाऱ्याकडून सारवासारव करण्यात आली. त्यानंतर त्याने कबुली देत बाहेर वाच्यता न करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मध्यस्थी करायला भाग पाडून, बाहेर वाच्यता न करण्यासाठी धमकावले देखील.
काही महिला पैसे मिळाल्या नाहीत म्हणून कार्यक्रम झाल्यानंतरही बराच वेळ सभागृहात थांबल्या होत्या. या प्रकरणावर रावसाहेब दानवे यांनी मीडियावरच आरोप करून बोलण्यास नकार दिला.


















