न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समितींच्या सभापतीपदाची निवड १४ जून रोजी होणार आहे.
या पदांसाठी आज महापलिकेत (दि. १०) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज सादर करण्यात आले. सत्ताधारी भाजपकडून विधी समिती सभापतीदासाठी अश्विनी बोबडे, महिला व बालकल्याण समिती निर्मला कुटे, शहर सुधारणा समिती राजेंद्र लांडगे आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदासाठी तुषार हिंगे यांचे प्रत्येक समितीसाठी एक अर्ज त्याप्रमाणे समिती सभापतीसाठी एकूण चार अर्ज आले आहेत.
विरोधी पक्षाकडून एकही अर्ज आला नाही. त्यामुळे या चौघांचीही सभापतीसाठी निवड निश्चित झाली आहे. विषय समितींच्या सभापतीपदासाठीचा सोपस्कार महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात १४ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.














