न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- मुंबई व महाराष्ट्र महापौर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या महापौर परिषदेचे आयोजन लोणावळा येथे करण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील विविध १६ महापालिकांचे महापौर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्षा व नागपूर महापालिकेच्या महापौर नंदा जिचकार, माजी केंद्रीय सचिव जयराज फाटक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पिंपरी चिंचवड मनपाचे महापौर राहुल जाधव व आदी महापौर उपस्थित होते.
महापौरांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून, अधिकारांची व्याप्ती वाढवावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिक महापौरांनाच ग्राह्य धरतात, असा सूर यावेळी महापौरांनी आळवला.


















