न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- शुभम शनिवारी त्यांच्या घरच्यांसोबत त्यांच्या वडिलोपार्जित जागेत पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून मुरूम टाकत होते. या जागेत मुरूम टाकू नये, यावरून आरोपींनी शुभम आणि त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करत फावड्याने मारहाण केली.
परस्परविरोधात भूषण बाळासाहेब काटे (वय 34, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली. ही घटना शनिवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.
त्यानुसार शुभम शिंदे, प्रसाद शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुरेखा शिंदे आणि साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भूषण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी भूषण यांच्या जागेत मुरूम टाकत होते. याबाबत भूषण यांनी विचारणा केली असता आरोपींनी भूषण आणि त्यांचा भाऊ जीवन या दोघांना फावड्याने मारहाण केली. तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

















