न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- आजोबांचा १६ वर्षीय नातू दहावीला होता. त्याने दहावीची परीक्षा दिली. शनिवारी (दि. ८) रोजी दहावीचा निकाल होता. निकाल आणण्यासाठी नातू दुपारी बाराच्या सुमारास घराबाहेर पडला. मात्र, संध्याकाळ झाली तरी घरी परतला नाही.
रात्र उलटून दुपार टळली तरी नातू घरी न आल्याने त्याच्या आजोबांनी रविवारी दुपारी सांगवी पोलीस ठाण्यात नातवाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


















