न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात १०० किलोपेक्षा अधिक कचरा साठत असल्यास त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. संबंधीत कचरा घेणाऱ्या संस्थेच्या ताब्यात हा कचरा द्यावा. त्याची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा ५ हजारापासून ते १५ रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सर्व संस्थांनी आपला १०० किलो कचरा स्थानिक संस्थेच्या सहभागाने कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण केलेला कचरा स्वतंत्र्यपणे ठेवावा. पुर्नप्रक्रिया करता येणा-या वस्तू अधिकृत व्यक्तींना अथवा संस्थेला द्याव्यात. जैविकरित्या कुजविण्यायोग्य कच-यावर संस्थेच्या आवारात जागीच प्रक्रिया करावी.
खत तयार करून त्याची विल्हेवाट लावावी. उरलेला घनकचरा स्थानिक अधिकृत संस्थेस द्यावा. सर्व संस्था, सोसायटी यांनी हे नियम न पाळणे बंधनकारक आहे. अन्यथा ५ हजार, १० हजार व १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती रॉय यांनी दिली.














