- डिजिटल सुविधांना प्रतिसाद; घरबसल्या कर भरण्याला प्राधान्य…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाच्या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीला मोठी पसंती मिळाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ७.८७ लाख मालमत्ताधारकांपैकी ६.३१ लाख नागरिकांनी ९६१.७४ कोटी रुपयांचा कर भरला. यापैकी ५.११ लाख नागरिकांनी ६९७.१९ कोटी रुपये ऑनलाईन भरले, जे एकूण संकलनाच्या ७२.४९ टक्के आहे.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सभापती अभिषेक बारणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑनलाईन कर भरा’ मोहिम राबविण्यात आली. एसएमएस, सोशल मीडिया व जनजागृतीमुळे नागरिकांनी डिजिटल पर्याय स्वीकारला.
“ऑनलाईन प्रणालीमुळे वेळ व श्रमांची बचत होत असून कर भरणे अधिक सुलभ झाले आहे,” असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.














