- ४७ वर्षीय आरोपी अटकेत; परिसरात संतापाची लाट…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ एप्रिल २०२६) :- काळेवाडी परिसरात अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून संपूर्ण शहरात संताप व्यक्त होत आहे. आंबे खायला देण्याचे आमिष दाखवत आरोपीने हे अमानुष कृत्य केल्याचे समोर आले आहे.
विजय भोसले (वय ४७) असे आरोपीचे नाव असून काळेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सोमवारी (दि. १३) आरोपीने शेजारी राहणाऱ्या चिमुरडीला घरी नेऊन अत्याचार केला. दरम्यान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई घटनास्थळी पोहोचली असता आरोपी पळून गेला.
मुलीला तातडीने दवाखान्यात दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.











