- निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार, दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वेळोवेळी यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सेक्टर क्रमांक २३ तसेच क्षेत्रीय स्तरावरील विविध स्थापत्य व विद्युत कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या कामांसाठी २८ एप्रिल रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून नियोजनबद्ध वापर करावा. कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहील.”
— प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका











