- पुतळ्यांचे सुशोभीकरण व धोकादायक जिना हटवण्याची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. २५ एप्रिल २०२६ :- पिंपरी-चिंचवडमध्ये विविध प्रलंबित कामांसंदर्भात २४ एप्रिल २०२६ रोजी शहर अभियंता (स्थापत्य) प्रमोद ओंभासे यांना तीन निवेदने सादर करण्यात आली.
पहिले निवेदन पिंपळे गुरव येथील कै. शेवंताबाई खंडूजी जगताप शाळेसंदर्भात होते. दुसऱ्या निवेदनात पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याजवळील धोकादायक लोखंडी जिना काढून सिमेंट काँक्रिट जिना उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच पुतळ्याच्या मागील बाजूस म्युरल्स उभारावीत, अशीही सूचना देण्यात आली. पिंपरी गावठाणातील पवनेश्वर मंदिराजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणीही करण्यात आली. यावर संबंधित विभागांना सूचना देऊन कामे मार्गी लावली जातील, असे ओंभासे यांनी सांगितले.











