- १२ विविध ट्रेडमध्ये संधी; २७ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. २५ एप्रिल २०२६ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी आस्थापनेवर सन २०२६-२७ या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांची तात्पुरती नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर २३ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत एकूण ४०७ जागा भरल्या जाणार असून कोपा, इलेक्ट्रिशियन, वायरमन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, प्लंबर, डीटीपीओ, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, सर्व्हेअर, ड्राफ्ट्समन सिव्हिल, मेकॅनिक मोटर व्हेईकल, इंस्ट्रुमेंट मेकॅनिक आणि माळी या १२ व्यवसायांचा समावेश आहे.
सन २०२३, २०२४ व २०२५ मध्ये संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुकांनी २७ एप्रिल ते ६ मे २०२६ दरम्यान NAPS पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. तसेच २७ एप्रिल ते ८ मे दरम्यान आयटीआय मोरवाडी येथे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.











