- स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ साठी महापालिकेचे आवाहन; मोठ्या सहभागाची गरज
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. २५ एप्रिल २०२६ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत शहराला अव्वल क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत होणाऱ्या या सर्वेक्षणात कचरा व्यवस्थापन, स्वच्छता सुविधा, नागरिकांचे समाधान आणि सहभाग यावर शहरांचे मूल्यमापन होते. त्यामुळे नागरिकांचा अभिप्राय हा रँकिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
महापालिकेकडून घरोघरी कचरा संकलन, जनजागृती आणि विविध उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल नंबर नोंदवून प्रश्नांची उत्तरे देत अभिप्राय सादर करावा. शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











