- नालेसफाई, रस्ते दुरुस्ती व ड्रेनेज कामांवर भर; आयटी परिसराची पाहणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे/हिंजवडी | दि. २५ एप्रिल २०२६ :- पावसाळ्यातील पाणी साचणे व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हिंजवडी आणि परिसरातील कामांना तातडीने गती देण्याचे आदेश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.आमदार शंकर मांडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी (२५ एप्रिल) हिंजवडी, माण, मारुंजी आदी भागांची पाहणी करण्यात आली.
या वेळी नालेसफाई, अतिक्रमण हटवणे आणि पावसाळी जलवाहिन्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः नांदे चौकातील स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच लक्ष्मी चौक, कोलते-पाटील रस्ता व नेरे-दत्तवाडी-जांबे मार्गांच्या विकासाचा आढावा घेण्यात आला.
आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता, महामार्ग ४८ ते हिंजवडी फेज-१ जोडरस्ता विकसित करण्याबाबतही चर्चा झाली. स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या लवकर सोडवण्याची ग्वाही प्रशासनाने दिली.










