न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. २७ एप्रिल २०२६ ) :- परिसरातील हॉटेल ‘थ्री -इडियट्स’ येथे बिल देण्यावरून सुरू झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणांना हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांकडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दि. २६ एप्रिल रोजी पहाटे १:३० वाजताच्या सुमारास गारवे लॉन्सजवळील हॉटेलच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला.
फिर्यादी सूरज झांजुर्णे (रा. भोसरी) हे मित्रांसह उपस्थित असताना काही ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये बिलावरून वाद सुरू होता. तो मिटवण्यासाठी पुढे आलेल्या सूरज व त्यांच्या मित्रांना आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी विकास सेवाणी याने धातूच्या कड्याने सूरज यांच्या नाक-तोंडावर प्रहार करून त्यांना जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.











