- वडिलांना कारच्या बोनेटवरून १०० फूट फरफटत नेले..
- काळूस ग्रामपंचायतीसमोरील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २७ एप्रिल २०२६ ) :- कामाचे बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला सहा ते सात जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काळुस येथे घडली आहे.
विशेष म्हणजे, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या वडिलांना आरोपींनी कारच्या बोनेटवर टाकून तब्बल १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?…
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय किसन डुंबरे (वय २२, रा. काळुस, ता. खेड) यांनी आरोपी सत्यवान म्हसाडे याच्याकडे आपल्या कामाच्या बिलाचे पैसे मागितले होते. याचाच राग मनात धरून रविवारी (दि. २६) रात्री उशिरा काळुस ग्रामपंचायतीजवळ आरोपींनी अक्षयला गाठले.
“तुला बिलाचे पैसे पाहिजेत का?” असे म्हणत अमोल आवटे, अजय बवले, निखिल खैरे, सत्यवान म्हसाडे, मारुती गव्हाणे आणि त्यांच्या इतर २ ते ३ साथीदारांनी अक्षयला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
वडिलांना कारच्या बोनेटवर फरफटत नेले
यावेळी शेखर गोरख पोटवडे हा तरुण भांडण सोडवण्यासाठी आला असता, त्यालाही हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. आरोपी मारहाण करून पळून जात असताना अक्षयच्या वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी आपली फ्रॉन्स गाडी त्यांच्या अंगावर घातली. अक्षयचे वडील गाडीच्या बोनेटवर पडले असतानाही चालकाने गाडी न थांबवता त्यांना सुमारे १०० फूट पुढे फरफटत नेले. त्यानंतर ते खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
चाकण पोलिसांत गुन्हा दाखल..
या प्रकरणी अक्षय डुंबरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल आवटे, अजय बवले, निखिल खैरे, सत्यवान म्हसाडे, मारुती गव्हाणे व इतर अनोळखी मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपा











