- शहर विकास, प्रकल्प प्रगती आणि प्रशासनाच्या कामकाजाचा घेतला जातोय आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक सुरू आहे. शहरातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला जात आहे.
या बैठकीस आमदार शंकर जगताप, आ. अमित गोरखे, आ. उमा खापरे, महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.
शहरातील पायाभूत सुविधा, नदी सुधार प्रकल्प, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच विविध नागरी सुविधांच्या कामांबाबत मंत्री मिसाळ या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असून, कामांची गती वाढविण्याबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे.
ही बैठक सध्या सुरू असून, महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











