- विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक; संशोधक वृत्तीला प्रोत्साहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’ ही काळाची गरज असल्याचे मत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केले. काळेवाडी येथील कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित ‘प्रोजेक्ट बेस्ड एक्झिबिशन’च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सामाजिक विषयांवर आधारित विविध प्रकल्प सादर केले. प्रत्येक प्रकल्पाची बारकाईने पाहणी करत बारणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पनांचे कौतुक केले.
यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्यासह शिक्षक, पालक व नागरिक उपस्थित होते.
बारणे यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि संशोधक वृत्ती विकसित होते. आगामी काळात हे प्रदर्शन शहर पातळीवर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.












