- ६० कोटींच्या आर्थिक व्यवहारावरून आम आदमी पार्टीचे आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- महापालिकेतील कथित बोगस उपसूचना प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी रविराज काळे यांनी केली आहे. १४ बोगस उपसूचनांच्या आधारे सुमारे ६० कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी १७ एप्रिल रोजी दक्षता विभागाला पाठविलेल्या पत्रात संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याचे नमूद केले आहे. चौकशी अहवालानुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक मंजुरी न घेता उपसूचना करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणात संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना निलंबित करणे, ठेकेदारांकडून रक्कम वसूल करणे व त्यांना काळ्या यादीत टाकणे, तसेच सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.












