- आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक उत्साहात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २८ एप्रिल २०२६) :- मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीस आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, जनसंपर्क वाढवणे आणि कार्यकर्त्यांना नव्या उर्जेसह दिशा देणे या उद्देशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आगामी काळात गावागावांत दौरे करून जनतेशी अधिक संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला. बैठकीला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. मावळच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन शेळके यांनी यावेळी केले.












