न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ एप्रिल २०२६) :- तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त रहाटणी पिंपळे सौदागर परिसरात भव्य “बुद्धरूपाची मिरवणूक” आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहात व मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांनी केले आहे.
शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता या मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीचा मार्ग आनंद बुद्ध विहार (नखाते नगर कमान, रहाटणी फाटाजवळ) येथून सुरू होऊन सारनाथ बुद्ध विहार- जीवनज्योती हॉस्पिटल- चॅलेंजर पब्लिक स्कूल मार्गे महाबोधी बुद्ध विहार (जगताप नगर, पिंपळे सौदागर) येथे समारोप होणार आहे.आदरणीय भंते धम्मानंद धम्मदेशना, मार्गदर्शन करणार आहेत व रात्री ९:00 वाजता सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सारनाथ बुध्द विहार (रहाटणीगाव), महाबोधी बुध्द विहार (पिंपळे सौदागर), आनंद बुध्द विहार (शास्त्रीनगर, रहाटणी), फिल ग्रुप (पिंपळे सौदागर), वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ (रहाटणी), भारतीय बौध्दजन विकास समिती (पिं.चिं. शहर), राहुल मित्र मंडळ (रहाटणी), तक्षशिला सेवा संस्था (पिंपळे सौदागर), यशोधरा महिला मंडळ (पिंपळे सौदागर), आनंद मित्र मंडळ (शास्त्रीनगर, रहाटणी), भिमशक्ती मित्र मंडळ (पवनानगर, रहाटणी) संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.












