न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २९ एप्रिल २०२६) :- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने अधिवक्ता महिला संमेलन उत्साहात पार पडले. “सद्य:स्थितीतील वाढत्या घटस्फोटांची मीमांसा” या विषयावर मार्गदर्शन करताना अध्यक्षा ॲड. नीलिमा गोखले यांनी अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, ज्येष्ठ समुपदेशिका डॉ. शिवलीला पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश गोरडे, ॲड. अंतरा देशपांडे, अधिवक्ता परिषद महामंत्री ॲड. संतोष गुरव, ॲड. अमेय पिंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. गोखले यांनी वैवाहिक नात्यातील किरकोळ मतभेदांवर संवाद व समुपदेशनाचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. ॲड. ज्योती पांडे यांच्या सांघिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ॲड. सुरेखा डिंभळे यांनी परिचय, ॲड. अंतरा देशपांडे यांनी प्रास्ताविक, ॲड. सुमिता दौंडकर यांनी माहिती, तर ॲड. श्वेता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रणिता कुलकर्णी व ॲड. बोधनी यांनी आभार मानले.












