न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० एप्रिल २०२६) :- थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ९ भाषांतील ५५१ पुस्तकांचा संग्रह करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
या उल्लेखनीय कार्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली असून त्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील या संग्रहामुळे संशोधकांना संदर्भासाठी मोठी मदत होत आहे. बारणे यांच्याकडे शिवरायांच्या ७० हून अधिक मूर्ती आणि नाण्यांचाही संग्रह आहे.
हा संग्रह नागरिकांसाठी थेरगाव येथे पाहण्यासाठी खुला असून संशोधकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येतो. त्यांच्या या कार्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.












