न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी Yashwantrao Chavan Memorial Hospital (वायसीएमएच) येथे अचानक भेट देत विविध विभागांची सखोल पाहणी केली. अतिदक्षता विभाग, नवजात शिशु विभाग, शस्त्रक्रिया, बालरोग, अस्थिरोग, ईएनटी, डायलिसिस, ओपीडी व आपत्कालीन विभागांसह सर्व सेवांचा त्यांनी आढावा घेतला.
भेटीदरम्यान आयुक्तांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधून सेवा सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. अनेकांनी उपचार व व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य सेवा अधिक तत्पर, प्रभावी व नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी Abhaychandra Dadewad यांनी रुग्णालयातील सुविधा, मनुष्यबळ व भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. वायसीएम रुग्णालय शहरातील प्रमुख सार्वजनिक आरोग्य केंद्र असून गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.













