न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- भारतीय चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळाला आपल्या स्वरांनी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना चिंचवड येथे ‘सूर आशा’ या विशेष कार्यक्रमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गुरुवार, ३० एप्रिल रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा पार पडला. मोरया थिएटर्स निर्मित या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या वेळी भाऊसाहेब भोईर, महापौर रवी लांडगे, प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रशांत साळवी व त्यांच्या चमूने सादर केलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विविध कलाकारांनी आशादीदींची अजरामर गाणी सादर करून त्यांना अभिवादन केले. उपस्थित रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.


















