- शेतकरी व नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणार : आमदार महेश लांडगे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. ७ मे २०२६ :- नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरणार असून, विकासकामांसोबत शेतकरी व नागरिकांच्या हितालाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत नगर रचना व भू संपादन विभागाची संयुक्त बैठक झाली. बैठकीत रॅम्प नियोजन, भूसंपादन प्रक्रिया आणि नागरिकांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. भोसरी, मोशी आणि बोऱ्हाडेवाडी येथे रॅम्पसाठी नव्याने जमीन संपादित न करता प्राधिकरणाच्या उपलब्ध जागेचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली. तसेच इंद्रायणी नदी परिसरातील रॅम्प नदीपलीकडे नियोजित करण्याचे निर्देश देण्यात आले.
ई प्रभाग कार्यालयाजवळील रॅम्प साईनाथ हॉस्पिटल परिसरात एका बाजूस करण्याचा निर्णय घेण्यात आला. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा, यावर बैठकीत भर देण्यात आला.













